¡Sorpréndeme!

Anand Dave: आत्मक्लेश म्हणून आजच्या दिवशी आम्ही प्रचार करणार नाही; आनंद दवे यांची भूमिका | Pune

2023-02-17 1 Dailymotion

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे म्हणाले की, 'जेव्हा युद्ध भूमीवर शत्रू सोबत लढ्या होतात तेव्हादेखील सहा सात वाजल्यानंतर शत्रूच्या सैन्यातील जखमींची देखील विचारपूस केली जाते. केवळ एक विधानसभा पोटनिवडणुक जिंकता यावी यासाठी भाजपा गिरीश बापट यांना मैदानात उतरवत असेल त्यासाठी हिंदू महासंघ कारणीभूत असल्यास त्याच्या यातना आम्हाला होत आहे. गिरीश बापट आणि आमचे संबध जवळपास २५ वर्षापासुन आहे. गिरीश बापट यांना पाहून काल मला दुःख झाले त्या गोष्टीचा आत्मक्लेश म्हणून आजच्या दिवशी आम्ही प्रचार करणार नाही' अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली